धुळे बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवाशी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 14:36 IST2019-12-05T14:36:38+5:302019-12-05T14:36:59+5:30
सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

धुळे बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवाशी त्रस्त
आॅनलाइन लोकमत
धुळे :येथील मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंग व इतर सुविधा नसल्याने, प्रवाशांमध्ये नाराजी आहे. बसस्थानकात सुविधा द्याव्यात अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानकात पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांच्या वाहन चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. स्थानकात दुचाकी वाहन पार्किंगची सुविधा करण्यात यावी. स्थानकाच्या आवारात सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून त्याचा प्रवाशांना त्रास होत असतो. प्रवाशांना मानपाठ दुखीचे आजार बळावले आहेत. त्यामुळे आवारात डांबरीकरण करून बसस्थानक धुळमुक्त करावे. बसस्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर बसस्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. निवेदनावर हिरालाल परदेशी, साहेबराव पाटील, हिरालाल सापे, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, रमेश पारोळेकर, एल.आर. राव, राकेश कुळकर्णी, डबीर शेख, अमोल निशाने, अजय चौधरी, महेश चौधरी यांची नावे आहेत.