धुळे : धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे आमदारकीचा १९ नोव्हेंबर रोजी राजीनामा देणार आहेत. महापालिका निवडणुकीत स्वत: महापौरपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शनिवारच्या सभेत डावलण्यात आल्याने गोटे यांनी भाषण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं भाषण रोखण्यात आल्याने त्यांनी काढता पाय घेतला. रविवारी सभा घेऊन त्यांनी स्व त:ची उमेदवारी जाहीर केली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांना भेटून राजीनामा देणार असल्याचे गोटे यांनी जाहीर केले.
धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:13 IST