धनूर डोंगरगाव, कौठळ रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:38+5:302021-03-09T04:38:38+5:30
ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात यावे, अशी मागणी धनूर येथील शेतकऱ्यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. ...

धनूर डोंगरगाव, कौठळ रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात यावा
ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात यावे, अशी मागणी धनूर येथील शेतकऱ्यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
धनुर ते डोंगरगाव आणि धनुर ते कौठळ या रस्त्याचे कामे मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळावी. यासाठी धनुर ग्रामपंचायतीने सभेपुढे विषय ठेवून सदर ठराव मंजूर केला आहे. यासाठी २०१८ पासून ते आजतागायतपर्यंत धनुर ग्रामपंचायतीमार्फत व शेतकरी प्रतिनिधी म्हणून साहेबराव हिरामण कोळी यांच्यासह येथील सर्व शेतकरी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही सदर रस्त्याचे काम झाले नाही. दोन्ही रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खरीप व रब्बी हंगामातील शेतातून आलेला उत्पादित माल बैलगाड्याने, वाहनाने घरापर्यंत, बाजारापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी सदर रस्त्याचे
काम हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी केली. आमदार कुणाल पाटील यांना निवेदन देताना धनुर येथील शेतकरी साहेबराव हिरामण कोळी, भटू खैरनार, माजी उपसरपंच विजय अभिमन चौधरी, माजी सरपंच अशोक पाटील, रवींद्र भामरे, दीपक पाटील, निंबा कोळी, सुरेश विनायक पाटील, धर्मा जिभाऊ पाटील, योगेश भामरे आदी शेतकरी उपस्थित होते.