धमाणे गाव १४ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:35 IST2020-07-18T13:34:51+5:302020-07-18T13:35:11+5:30
गावात फवारणी : कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांचे घेतले स्वॅब

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धमाणे : येथील माजी सरपंच यांचा काल कोरोणामुळे मृत्यू झाल्यानंतर गावात १४ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे .दरम्यान शुक्रवारी दिवसभर धमाने गावात वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणीला सुरुवात केली. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले. तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. गावातील नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. कोरोना मुक्तीसाठीच्या विविध उपाययोजनांवर प्रशासनाने भर दिल्याचे दिसून आले.
धमाणे गावात कोरोना रुग्ण आढळताच आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्तपणे गावात दक्षता मोहीम राबविण्यास सुरुवात केली. नगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी तरन्नुम पटेल, आरोग्य कर्मचारी मीनाक्षी जगदेव आरोग्य सेवक युवराज मोरे , यु.पी. सोनवणे, डी.बी. पाटील यांच्यासह त्यांचे वैद्यकीय पथक व धमाणे सरपंच रमेश बैसाणे, उपसरपंच वासुदेव बोरसे , योगेश पाटीलसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी यु.एस. सोनवणे, ग्रामसेवक अविनाश बैसाणे, संजय जाधव, अनिल बैसाने ,गजानन वाघ, मुरलीधर मोरे पोलीस पाटील यांच्यातर्फे प्रवीण गवते व ग्रामपंचायतचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका ज्ञानज्योती पाटील ,सुनिता पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील माध्यमिक शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थित ग्रामपंचायतीमध्ये बैठक बोलून योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्याकडून देण्यात आल्या.
एकूण चार पथकामार्फत गावात वैद्यकीय तपासणी व सर्वे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.