एऩसी़सी़ कॅडेट स्पर्धेत देवरेला सुवर्णपदक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:04 IST2018-12-16T17:03:41+5:302018-12-16T17:04:09+5:30

वार्षिक शिबीर  : चारशे विद्यार्थ्याचा सहभाग 

Devreela Gold Medal in the NCC Cadet Championship | एऩसी़सी़ कॅडेट स्पर्धेत देवरेला सुवर्णपदक 

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे- जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या ४८ महाराष्ट्र बटालियन एऩसी़सी़मार्फेत वार्षिक एऩसी़सी़ प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले़ 
या स्पर्धेत धुळे, मालेगाव, चाळीसगाव जिल्ह्यातील ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते़ जो़रा़सिटी हायस्कुलच्या २४ विद्यार्थ्यांची निवड झाली़ त्यात नेमबाजी स्पर्धेत चिरंतन छोटू देवरे याने सुवर्णपदक पटकावले. त्याचा बटालियनचे कमांडींग आॅफिसर कर्नल रजिंदर सिंह यांच्याहस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला होता़  कॅडेट देवरे याच्या कामगिरीमुळे संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल, मुख्याध्यापिका आऱआऱपेटारे, उपमुख्यापक बीक़े़नेरकर, पर्यवेक्षक जोग, चव्हाण यांनी कौतुक केले़ त्याला चिफ आॅफिसर एऩव्ही़नागरे यांचे मार्गदर्शन लाभले़ 

Web Title: Devreela Gold Medal in the NCC Cadet Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे