देवेंद्रची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:42+5:302021-09-15T04:41:42+5:30
त्यापूर्वी राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धा वैराग (जि.सोलापूर) या ठिकाणी ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र आणि ग्रॅपलिंग कमिटी ऑफ सोलापूर यांच्यातर्फे झाली ...

देवेंद्रची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड
त्यापूर्वी राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धा वैराग (जि.सोलापूर) या ठिकाणी ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र आणि ग्रॅपलिंग कमिटी ऑफ सोलापूर यांच्यातर्फे झाली आहे. त्यात देवेंद्र मधुकर पाटील याने द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक मिळविले. या खेळाडूची दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. सदर खेळाडूला कुस्ती प्रशिक्षक कन्हैयालाल माळी, कुस्तीगीर एस. एच. निकुंभे, क्रीडा संचालक अमोल अहिरे, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन हासवानी, डॉ. मनोज गिरासे यांनी कौतुक केले.
फोटो- मेलवर/फाईल पहाणे