मानवी साखळीद्वारे बालमजुरी हद्दपार करण्याचा निश्चय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:39+5:302021-06-16T04:47:39+5:30

धुळे : आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरीला हद्दपार करण्याचा निश्चय चाईल्ड लाईन संस्था, बालकल्याण समिती, बालसंरक्षण पोलीस पथक, ...

Determination to eradicate child labor by human chain | मानवी साखळीद्वारे बालमजुरी हद्दपार करण्याचा निश्चय

मानवी साखळीद्वारे बालमजुरी हद्दपार करण्याचा निश्चय

धुळे : आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरीला हद्दपार करण्याचा निश्चय चाईल्ड लाईन संस्था, बालकल्याण समिती, बालसंरक्षण पोलीस पथक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प पथक, महिला बालविकासचे बालसंरक्षण कक्ष, आदींनी केला. या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ जून रोजी धुळे बारापत्थर चाैकातील उर्दू शाळेत बालमजुरी विरोधी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती सदस्य प्रा. वैशाली पाटील, मीना भोसले, ॲड. मंगला चौधरी, मोनिका जेजोटे, सरकारी कामगार अधिकारी अवधूत रुईकर, आदी उपस्थित होते .

यावेळी बालकल्याण समिती सदस्य प्रा. वैशाली पाटील यांनी सांगितले की, देश विकसित बनवायचा असेल तर मुलांचे भविष्य बदलण्याची गरज आहे. बालकांना काम लावणाऱ्या त्या मालकाविरोधात किंवा पालकाविरोधात गुन्हा दाखल होतो. पाच वर्षे कैद, एक लाख दंड अशी शिक्षा आहे.

याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

सरकारी कामगार अधिकारी अवधूत रईकर यांनी बालकामगार कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने म्हणाले की, एकमेकांच्या सहकार्याने काम केले तरच जनजागृती शक्य आहे. गॅरेज, चहा संघटनेचे प्रमुख अशा विविध संघटनांची बैठक घेऊन प्रबोधन करण्याची गरज आहे. यावेळी वाढत्या बालमजुरीबाबत चिंतन करण्यात आले. लाॅकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे देखील बालमजूर वाढले आहेत. बालमजुरी कमी करण्यासाठी मानवी साखळी करावी. सर्व घटक व प्रशासन एकत्र आले तर बालमजुरी हद्दपार करता येईल.

यावेळी मोनिका जेजोटे यांचा सत्कार बालकल्याण समितीने केला. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा सत्कार मीना भोसले यांनी चाईल्ड लाईनमार्फत केला.

बाल संरक्षण कक्षाचे जगदीश झिरे, अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाचे मनोज मोरे, पोलीस काॅन्स्टेबल भारती मोहने, राहुल पाटील, भारती पटले, होमगार्ड उमेश सोनार, यशवंत बैसाणे, प्रकाश जगताप, महादू सूर्यवंशी, बापू दुकळे, वाल्मीक देसले, मोहनीष भामरे, राष्ट्रीय बालकामगार पथकाचे देविदास बडगुजर, जयश्री निकम, सपना देवरे, वाल्मीक देसले, ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक नफिस अहमद अनीस,

चाईल्ड लाईन पथकाचे समन्वयक अजय ताकटे, रूपाली झाल्टे, समुपदेशक सुकलाल गायकवाड, भाग्यश्री जैन, जगदीश जगताप, नितीन साबळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Determination to eradicate child labor by human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.