बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस पिकाचे अवशेष नष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:09+5:302021-01-20T04:35:09+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड होते. कापूस या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ...

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस पिकाचे अवशेष नष्ट करा
जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड होते. कापूस या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कापूस फरदड निर्मूलन मोहिमेंतर्गत शेतातून कापूस पीक काढून टाकणे अपेक्षित नसून, पीक काढणीनंतर कापसाच्या पऱ्हाट्या व इतर अवशेष नष्ट करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेंतर्गत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. त्यात ज्या शेतातील कापूस पीक काढल्यानंतर तेथे इतर पिके घेण्यात आलेली आहेत, तेथील पऱ्हाट्या व कापूस पिकाचे इतर अवशेष नष्ट करावे. शेवटची वेचणी झाल्याबरोबर डिसेंबरनंतर ज्या शेतकऱ्यांनी कापूस पीक शेतामध्ये, तसेच उभे ठेवलेले आहे, अशा ठिकाणी प्राधान्याने फरदड निर्मूलनाची मोहीम राबवावी. शेवटच्या वेचणीनंतर कापसाच्या शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावी आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.