शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

जगाच्या नकाशावरुन पाकिस्तान नेस्तनाबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:37 PM

आमदार टी राजासिंह : धुळ्यातील हिंदू सभेत परखड मत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुलवामा येथील आक्रमण हे पाकिस्तानचे भारताविरूद्धचे छुपे युद्ध आहे. त्याला भारताने चोख उत्तर द्यायला हवे. पाकिस्तानवर आक्रमण हा देशातील प्रत्येक देशप्रेमी नागरिकांचा आवाज आहे.  हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे विसरुन चालणार नाही असे परखड मत गोरक्षक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांनी व्यक्त केले.येथील मालेगाव रोडवरील गिंदोडीया मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत आमदार राजासिंह बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते़ आमदार राजासिंह म्हणाले, पाकिस्तान हा आजचा अफजलखान असून त्याचा कोथळा काढला नाही, तर भारतावर संकट निश्चित आहे. पंतप्रधान मोदी हे देशप्रेमी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एका सर्जिकलने पाकिस्तान सुधारणारा नाही. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नेस्तनाबूत करणे, हेच सैनिकांच्या हौतात्माचे उत्तर ठरेल, असेही आमदार राजासिंह यांनी सांगितले़ आज देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आवश्यकता आहे. महाराजांनी युवकांना एकत्र करून हिंदवी राष्ट्राची स्थापना केली. आजही अशाच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत आपण हिंदु राष्ट्राची शपथ घेत नाही आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करत नाही, तोपर्यंत हिंदूंवरील अत्याचार थांबणारे नाहीत.रागेश्री देशपांडे म्हणाल्या, आजच्या सभेला उपस्थित प्रत्येक हिंदू स्वत:ची जात-पात, पक्ष, संप्रदाय आणि संघटना विसरून केवळ हिंदु-राष्ट्र स्थापनेसाठी संघटित झाला आहे. आता एकच लक्ष, हिंदु-राष्ट्ऱ असे सांगत त्या म्हणाल्या, आमचा हा शौर्यशाली इतिहास दडपण्याचे षडयंत्र चालू आहे. आज हिंदूंपुढे जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदू नेत्यांच्या हत्या यासारखी संकटे उभी ठाकली आहेत. हिंदु मुलींना धर्मांधांकडून लग्नाचे प्रलोभन दाखवून फसवण्यात येते. या मुलींपासून अपत्ये जन्माला घालून जग इस्लाममय करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे रोखण्यासाठी हिंदू युवतींना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला आणि पुरुषांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण, धर्मशिक्षण दिले जात आहे. यामध्ये सर्व हिंदू भगिनींनी सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले़ काश्मीरमध्ये यापुढे सैन्यावर दगडफेक करणाºयांना रबरी गोळ्यांनी नव्हे, तर एके-४७ ने उत्तर द्या. जवानांवर फेकलेल्या प्रत्येक दगडाचे उत्तर गोळीने दिले जाईल, असा संदेश द्यायला हवा. आम्ही केवळ निंदा करतो आणि बदला घेण्याची भाषा करतो; परंतु यांची खोड जिरवण्यासाठी यांच्यावर आक्रमण करणे हाच उपाय आहे. त्यामुळे आता भारताला संरक्षणमंत्र्यांची नाही, तर युद्धमंत्र्यांची आवश्यकता आहे, असे प्रशांत जुवेकर म्हणाले़ प्रारंभी शंखनाद करण्यात आला. व्यासपिठावर सुनील भोलाणेकर, अनिल दीक्षित, एकनाथ भावे यांनी वेदमंत्रपठण केले. सचिन वैद्य यांनी समितीच्या राष्ट्र-धर्म विषयक उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. या सभेचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा कोरेगावकर यांनी केले. पंकज बागुल यांच्यासह अन्य उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे