देवकानगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 20:54 IST2019-12-27T20:54:24+5:302019-12-27T20:54:42+5:30
जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन : ठेलारी बहुसंख्या गावात मुलभूत सुविधा मिळाल्या नाहीत

देवकानगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
आॅनलाइन लोकमत
धुळे :शिंदखेडा तालुक्यातील देवकानगर (कर्ले) येथे रस्त्याची सोय नाही, लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभही मिळालेला नाही. तसेच अधिकारी, लोकप्रतिनिधींनीही या गावाकडे दुर्लक्ष केल्याने, ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन ग्रामस्थानी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) उन्मेश महाजन यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देवकानगर कर्ले या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर २००९-१० पासून ठेलारी मेंढपाळांचे गाव वसले आहे. याठिकाणी रस्ता नसल्याने शालेय विद्यार्थी दऱ्याखोºयातून पायी जात असतात. गावकऱ्यांना रेशनही मिळत नाही. मेंढपाळांना घरकूल योजनेचे घरे अजून उपलब्ध झालेले नाहीत. तरही कोणतेही शासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी येथे भेट द्यायला आले नाहीत. खासदारही आले नाहीत. शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर पावबा ठेलारी, देवा ठेलारी, बापू ठेलारी, चिमा ठेलारी, बापू शिंदे,खेमा गोयकर, अप्पा ठेलारी, सोनी पिसाळ आदींच्या स्वाक्षºया आहेत.