वसमार येथील ६ वर्षाच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:30 IST2019-11-29T22:29:52+5:302019-11-29T22:30:36+5:30
नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन

Dhule
म्हसदी : वसमार येथील रहिवासी हेमांगी किशोर नेरे (८) हिचे २८ रोजी डेंग्यू आजाराने नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.
येथील किशोर जंगलू नेरे हे धडगांव (नंदुरबार) येथील कै.पी.पी.पराडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षक कॉलनीत वास्तव्य आहे. त्यांची कन्या हेमांगीची अकस्मात तब्येत बिघडली आणि तिला तातडीने धडगाव, शहादा, धुळे येथील रूग्णालयातून नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गुरुवारी डेंग्यू आजाराने तिचे निधन झाले. हेमांगी ही जुन्या धडगाव मधील जि.प.च्या प्राथमिक शाळेत दुसरीत शिक्षण घेत होती. हेमांगी हुशार व चंचल असल्यामुळे ती सर्वांची आवडती होती. घटनेची माहिती विद्यार्थी व शिक्षकांना समजताच सर्र्वांना अश्रु आवरता आले नाहीत. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हेमांगीवर अंत्यसंस्कार करण्यात आला. येथील विज मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी जंगलू नेरे यांची नात होती.