शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धुळे महापालिका बरखास्त करण्याची आमदारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 4:54 PM

बेकायदेशिर ठराव केल्याचा आरोप, मंत्रालयात बैठक

ठळक मुद्दे-नगरसेवकांची पदे रद्द करण्याची मागणी-मनपाने शासन हिताविरूध्द केले ठराव-आमदारांच्या मागणीबाबत मंत्रालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने केलेले नियमबाह्य ठराव व नगरसेवकांचे गैरवर्तन व यापूर्वी केलेल्या पाठपुराव्याचा संदर्भ देत आमदार अनिल गोटे यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे़ विशेष म्हणजे आमदारांच्या निवेदनावर सोमवारी मंत्रालयात बैठक देखील झाली़शहरातील सार्वजनिक जागेवर असलेली व सार्वजनिक हिताची आरक्षणे बेकायदेशिरपणे रद्द करण्याचा नवा पायंडा पाडला आहे़ मनपाने १५ मे २०१४ ला तत्कालिन उपमहापौरांचे सर्व्हे क्रमांक ५७ ब वरील अतिक्रमण नियमित करण्याचा ठराव केला, अशा प्रकारचा ठराव करणे मनपा व शासनाच्या हिताविरूध्द आहे़ एवढेच नव्हे तर शासनाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता संबंधित भूखंड ३६ लाख १८ हजारात विक्रीस काढल्याचे आमदारांच्या निवेदनात नमुद आहे़ त्याचप्रमाणे ३ जुलै २०१५ रोजी अंमलात आलेल्या विकास योजनेत जयहिंद शैक्षणिक ट्रस्टच्या जागेतून १५ मीटर डीपी रस्ता जात असल्याचे नमुद आहे़ परंतु महापालिकेच्या ३१ आॅगस्ट २०१७ च्या सर्वसाधारण सभेत नगररचना अधिनियम ६६ च्या ३७(१) तरतुदीनुसार १५ मीटर डीपी रस्ता वगळण्याबाबत मान्यता देऊन मनपाच्या हिताविरूध्द निर्णय घेतला आहे, असे आमदार अनिल गोटे यांनी नगरविकास सचिवांना १६ मे रोजी दिलेल्या निवेदनात नमुद आहे़ मनपातील सत्ताधारी पक्षाने पदाचा गैरवापर करून मनपा हिताविरूध्द केलेल्या कारवाईमुळे मनपा बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी शासनाकडे केली आहे़ त्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठकही झाली़ 

टॅग्स :Dhuleधुळे