वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:10+5:302021-01-16T04:40:10+5:30

धुळे शहरात होेतेय पाण्याची नासाडी धुळे : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ ...

Demand for wildlife conservation | वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

धुळे शहरात होेतेय पाण्याची नासाडी

धुळे : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचे नियोजन तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे असले, तरी तांत्रिक कारणामुळे अनेक भागात वेळेत पाणीपुरवठा होत नाही. त्यातच शहरातील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत असते.

जमनागिरी रोड भागात घाणीचे साम्राज्य

धुळे : येथील जमनागिरी रोडवरील शासकीय वसाहत, कारागृह कर्मचाऱ्यांच्या वसाहत आणि इतरही वसाहतींमध्ये स्वच्छतेची गरज आहे. शहरातील जिल्हा कारागृहाच्या कर्मचारी वसाहतीत मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढले असल्याने त्याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण अधिक असल्याने वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था

धुळे : जिल्ह्यातील ९ उपकेंद्रांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या इमारती पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य उपसंचालकांना प्रस्ताव पाठवला आहे. जिल्ह्यात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी काही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. काही केंद्रांच्या इमारतींना गळती लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने आरोग्य केंद्राच्या १२ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले.

धुळ्यातील रस्त्यावर कचरा पडून

धुळे : शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वसाहतींमधील कचरा उचलला जातो; मात्र काही ठिकाणी अजूनही रस्त्यावरच कचरा टाकला जातो. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा कचरा नियमित उचलण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांनी केलेली आहे.

नागपूर-सुरत महामार्ग कामाला गती

धुळे : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने फागणे ते नवापूर प्रलंबित १४० किलोमीटरच्या महामार्ग चाैपदरीकरणाला सुरुवात केली आहे. या कामाची अत्याधुनिक यंत्राद्वारे दर्जा तपासणी केली जात आहे. या तपासणीमुळे यापूर्वीचा रस्ता आणि आताचा रस्ता याबाबतचे वास्तव समोर येणार आहे. तसा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

Web Title: Demand for wildlife conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.