मालपूरला हुतात्मा स्मारकासाठी ग्रामपंचायतकडे केली जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:46+5:302021-09-03T04:37:46+5:30
देशभक्ती कायम जागृत रहावी, देशाच्या सीमेवरील जवानाच्या प्रती आदर निर्माण व्हावा, सैन्य दलात भर्ती होण्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळावी, शहीद ...

मालपूरला हुतात्मा स्मारकासाठी ग्रामपंचायतकडे केली जागेची मागणी
देशभक्ती कायम जागृत रहावी, देशाच्या सीमेवरील जवानाच्या प्रती आदर निर्माण व्हावा, सैन्य दलात भर्ती होण्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळावी, शहीद होणाऱ्या जवानांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून श्रद्धांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक बनवण्याकामी हक्काची जागा ग्रामपंचायत प्रशासनाने द्यावी अशी मागणी यावेळी निवेदनकर्त्यांनी लोकनियुक्त सरपंचांकडे केली. यावर सरपंच मच्छिंद्र शिंदे यांनी हा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठेवून, कायदेशीर सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे उपस्थित पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी बाॅर्डर ग्रुपचे प्रमुख नरेश सावंत, प्रशांत पवार, दिनेश माळी, निलेश तावडे, विरेंद्र पवार आदींसह मोठ्या संख्येने तरुण वर्गासह पत्रकार उपस्थित होते.
020921\1241-img-20210902-wa0005.jpg~020921\img-20210902-wa0002.jpg
मालपूर ता शिंदखेडा येथे हुतात्मा स्मारकासाठी जागेची मागणी करणारे निवेदन लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे यांना देतांना फौजी दीपराज जाधव, माजी सैनिक मनोज रावल, नरेश सावंत, प्रशांत पवार, निलेश तावडे, दिनेश महाजन, आदी सह मालपूरकर युवक~जागेची मागणी फोटो नं दोन