विविध फळांसह खाद्यपदार्थांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:39 IST2019-05-31T12:38:38+5:302019-05-31T12:39:19+5:30

पवित्र रमजान महिना : २४ उपवास पूर्ण

Demand for food with various fruits | विविध फळांसह खाद्यपदार्थांना मागणी

बाजारात फळांची खरेदी करतांना मुस्लिम बांधव  

धुळे :  मुस्लीम बांधवांचा उपवासांचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्व अंतीम टप्प्यांत येऊन पोहचला आहे. गुरूवार ३० रमजानचे २४ उपवास पूर्ण झाले. येत्या शनिवारी १ शब-ए-कद्रची रात्र शहर व परिसरात साजरी होणार आहे. 
रमजान पर्वाला मागील २४ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त  सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये नमाजपठण करण्यासाठी गर्दी होत आहे.
 रमजान पर्वाचा अखेरचा खंड सुरू असून या दहा दिवसांकरिता मशिदींमध्ये २४ तास मुक्काम  करण्यावर समाजबांधव भर देतात.  शहरात सामुहिक ऐतेकाफ आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत मशिदींमध्ये मुक्काम करणाºया व्यक्तींसाठी पहाटे सहेरी तर सायंकाळी इफ्तारची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Demand for food with various fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे