जम्बो कॅनाॅलद्वारे हरण्यामाळ, नकाणे तलाव भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:04+5:302021-08-25T04:41:04+5:30
धुळे : धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून जम्बो कॅनाॅलद्वारे पाणी सोडून हरण्यामाळ आणि नकाणे तलाव भरण्याची मागणी ...

जम्बो कॅनाॅलद्वारे हरण्यामाळ, नकाणे तलाव भरण्याची मागणी
धुळे : धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून जम्बो कॅनाॅलद्वारे पाणी सोडून हरण्यामाळ आणि नकाणे तलाव भरण्याची मागणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केली आहे.याबाबत कदमबांडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, अत्यल्प पावसामुळे सन २००२ प्रमाणे भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अक्कलपाडा प्रकल्पातून हरण्यामाळ व नकाणे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. त्यासाठी पावसाळ्यातच हे तलाव भरण्याची आवश्यकता आहे. कारण उन्हाळ्यात पाणी सोडले तर पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यात कालव्याद्वारे पाणी आणणे जिकीरीचे होईल. सद्यस्थितीत अक्कलपाडा प्रकल्पात ३५ टक्के जलसाठा झाला आहे. धुळे शहराच्या नागरिकांवर पुढील काळात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून जम्बो कॅनाॅलद्वारे पाणी सोडून हरण्यामाळ आणि नकाणे तलाव भरण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.