साक्री रोडवर दुभाजक टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:31+5:302021-01-22T04:32:31+5:30
भूमिगत गटारींमुळे रस्त्याची दैनावस्था धुळे : शहरात अनेक ठिकाणी भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. यासाठी चांगले रस्ते मधोमध ...

साक्री रोडवर दुभाजक टाकण्याची मागणी
भूमिगत गटारींमुळे रस्त्याची दैनावस्था
धुळे : शहरात अनेक ठिकाणी भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. यासाठी चांगले रस्ते मधोमध खोदण्यात येत आहेत. भूमिगत गटारीचे पाइप टाकल्यानंतर थातूरमातूर पद्धतीने रस्ता बुजविण्यात येत आहे. हे रस्ते चालण्यायोग्यही राहिलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
६३० कुटुंबांकडे शौचालये नाहीत
धुळे : जिल्ह्यात स्वच्छ भारत ग्रामीण योजना २ ॲाक्टोबर २०१४ पासून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २ लाख ७५ हजार २७२ कुटुंब असून, यापैकी २ लाख ६८ हजार २१० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. ६ हजार ४४२ कुटुंबे सार्वजिनक शौचालयांचा वापर करतात. आता फक्त ६३० कुटुंबांकडे शौचालये नाहीत.
मुक्कामी बसेस पूर्ववत सुरू कराव्यात
दोंडाईचा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोंडाईचा आगाराच्या अनेक गावांच्या मुक्कामी बसेस बंद करण्यात आलेल्या होत्या. आता सर्वच बस सेवा सुरळीत झालेली असून, बंद केलेल्या मुक्कामी बसेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.
ट्रॅक्टर चालकांचे वाहन परवाने तपासावेत
धुळे : ग्रामीण भागात ट्रॅक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक ठिकाणी भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविले जातात. त्यामुळे अपघातही वाढलेेले आहे. इतर वाहनांप्रमाणे ट्रॅक्टर चालकांचीही परवाने तपासणी गरजेचे आहे.
प्रवाशांसाठी निवारा उभारण्याची गरज
नवलनगर : अमळनेर-धुळे रस्त्यावर असलेल्या नवनगर येथे प्रवासी निवाऱ्याची सुविधा नसल्याने, प्रवाशांना रस्त्यावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागते. पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी आहे.
शाळेजवळील रस्ता दुरुस्त करावा
फागणे : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बाफना शाळेजवळील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. काही मीटरच्या अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्ता दुरुस्तीची गरज आहे.
विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची उत्सुकता
धुळे : शासनाने पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले असून, २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये आतापासून उत्सुकता निर्माण झालेली आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे.