व्यापारी संकुलासमोरील गटार बंदिस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:36+5:302021-06-16T04:47:36+5:30

धुळे : येथील कमलाबाई कन्या शाळेसमोर असलेल्या गरुड व्यापारी संकुलाच्या पार्किंगच्या आधी असलेल्या गटाराची फरशी तुटल्याने एक कार गटारामध्ये ...

Demand for closure of gutters in front of commercial complexes | व्यापारी संकुलासमोरील गटार बंदिस्त करण्याची मागणी

व्यापारी संकुलासमोरील गटार बंदिस्त करण्याची मागणी

धुळे : येथील कमलाबाई कन्या शाळेसमोर असलेल्या गरुड व्यापारी संकुलाच्या पार्किंगच्या आधी असलेल्या गटाराची फरशी तुटल्याने एक कार गटारामध्ये फसली. सुदैवाने दुखापत किंवा नुकसान झाले नाही; परंतु अपघाताचा धोका वाढला असल्याने गटार बंदिस्त करण्याची मागणी होत आहे. शहरातील गरुड व्यापारी संकुलाच्या बाहेर पार्किंग जागेत असलेल्या गटारावर सिमेंटचे झाकण होते. हे झाकण गहाळ झाले आहे. गटार उघडे असल्याने त्यात काही विद्यार्थिनी पडल्याच्या दुर्घटनादेखील घडल्या आहेत. तरीदेखील गटार बंदिस्त करण्याची उपाययोजना पालिकेने केली नाही. या गटारात रविवारी एक नवी कोरी कार फसली. कारचे फारसे नुकसान झाले नाही किंवा कुणाला दुखापतही झाली नाही. परंतु भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे गटार बंदिस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Demand for closure of gutters in front of commercial complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.