जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:27 IST2020-04-15T21:27:12+5:302020-04-15T21:27:35+5:30

देवपूर : तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

Deleted post that created racial profiling | जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी देवपूरातील तरुणाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
विनोद दगडू मोरे (वय २६, रा़ प्लॉट नं़ १२३, आरती कॉलनी, देवपूर) असे या तरुणाचे नाव आहे़ ३१ मार्च रोजी साडेअकरा ते एक एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले़
कोरोना विषाणुच्या साथीमुळे विविध प्रतिबंधात्मक आदेश लागु आहेत़ तरी देखील या तरुणाने फेसबुकवरुन तीन चित्र असलेली पोस्ट टाकली़ त्याच्या या पोस्टमुळे दोन धर्मात जातीय तेढ निर्माण होण्याची श्यकता आहे़ ऐक्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे़ तसेच त्याने टाकेलेल्या या पोस्टमुळे जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे़
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दिलीप दारक्या वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विनोद मोरे याच्या विरुध्द देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम २९५ (अ),५०५ (२), १८८ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब, ५४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे़ तपास पीएसआय लोकेश पवार करीत आहेत़

Web Title: Deleted post that created racial profiling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे