मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार टप्याटप्यात या योजनेचा लाभ फेरीवाल्यांना दिला जात आहे. मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभासाठी बॅकेत प्रस्ताव पाठविण्यात येतात. लाभार्थांची संपूर्ण माहिती घेऊन बॅकेव्दारे अर्थसाहाय्य केले जाते. मात्र काही बॅकांकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ दिला जात नसल्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना महामारीच्या काळात तीन महिने व्यवसाय ठप्प हाेते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसाय करण्यासाठी फेरीवाल्यांना अर्थसाहाय्य होण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातुन पीएम स्वनिधी योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप या योजनेची माहिती फेरीवाल्यांना मिळालेली नाही. त्यामुळे माहिती घेऊन लवकरच बॅकेकडे प्रस्ताव पाठवणार आहे. बॅकेकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
-पंकज माळी, भाजीविक्रेता
पीएम स्वनिधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव बॅकेकडे पाठविला आहे. यासाठी मात्र चार ते पाच महिन्यानंतरही बॅकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन ते तीन वेळा बॅकेत फेऱ्या मारून झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लाभार्थांची यादी बॅकेत लावली जाईल. त्यानंतर विचारणा करावी, अशी उत्तरे बॅकेकडून दिली जातात.
-उज्वल ठाकूर, व्यावसायिक
बॅकेकडून सहकार्य केले जाते.
पीएम स्वनिधी योजनेची व्यवसायिकांना बॅकेकडून वेळोवेळी माहिती दिली जाते. आतापर्यत प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थांना बॅकेच्या माध्यमातून धनादेश देण्यात आलेला आहे. लाभार्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांना बॅकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तीन ते चार महिने उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगार व्हावे लागले. त्यामुळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करावा लागला. केंद्र सरकारकडून दहा हजार रुपयांंपर्यत अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याने बॅकेकडे प्रस्ताव पाठविला होता. तीन ते चार महिने पाठपुरावा केल्यानंतर योजनेचा लाभ मिळाला. केंद्राच्या योजनेचा लाभार्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून दखल घेण्याची गरज आहे.
-श्रीधर महाजन, फेरीवाला