संरक्षण मंत्रीच गुंडाना संरक्षण देतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:37 IST2018-12-07T12:37:32+5:302018-12-07T12:37:57+5:30

हर्षवर्धन पाटील : काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीची प्रचार सभा

The Defense Minister gives protection against bullying | संरक्षण मंत्रीच गुंडाना संरक्षण देतात

संरक्षण मंत्रीच गुंडाना संरक्षण देतात

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :सीमेवर सैनिक शहीद होत असतांना देशाचे संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे धुळयात निवडणुकीत गुंडांना उमेदवारी देऊन संरक्षण देत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी धुळ्यातील प्रचारसभेत केले.
देवपुरातील दत्त मंदिर चौकात आयोजित प्रचार सभेत हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, भाजपने गेल्या चार वर्षात धुळ्यासाठी एक दमडीही दिली नाही. उलट विकास कामात खोडा घालून विकास थांबविण्याचे काम केले आहे. काँग्रेसने धुळ्याची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र त्यातही अडथळे आणून योजना रखडविण्याचे पाप भाजपने केल्याचे आरोपही पाटील यांनी केले.
प्रचार सभेला आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी मंत्री शोभाबाई बच्छाव, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, संदीप बेडसे, डॉ.दरबारसिंग गिरासे उपस्थित होते.

Web Title: The Defense Minister gives protection against bullying

टॅग्स :Dhuleधुळे