वराह चोरीची बदनामी, तरुणावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:02+5:302021-09-10T04:43:02+5:30
साक्री तालुक्यातील देगाव येथे शंकर जगन सोनवणे हा तरुण वराह पालनाचा व्यवसाय करतो. तो गावातील डुकरे चोरतो अशी बदनामी ...

वराह चोरीची बदनामी, तरुणावर कोयत्याने वार
साक्री तालुक्यातील देगाव येथे शंकर जगन सोनवणे हा तरुण वराह पालनाचा व्यवसाय करतो. तो गावातील डुकरे चोरतो अशी बदनामी काशिनाथ जगन सोनवणे, शिवदास काशिनाथ सोनवणे, सुनील काशिनाथ सोनवणे हे करतात. म्हणून शंकर त्यांना जाब विचारण्यासाठी गेला हाेता. त्यांना जाब विचारण्याच्या कारणावरुन त्याचा राग त्यांना आला. शिवीगाळ करीत शंकर सोनवणे याला हाताबुक्यांनी तसेच उजव्या पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार काशिनाथ जगन सोनवणे, शिवदास काशिनाथ सोनवणे, सुनील काशिनाथ सोनवणे या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस करीत आहेत.