उत्तम मानला जातो. शिवाय आधीच कापूस पेरणी होऊन उगवलेल्या रोपांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे आणि नेमकी या काळातच पावसाने हुलकावणी दिली आहे.
या आधी सुद्धा या परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस दुसऱ्या किंवा तिसऱ्या चरणात झाल्याचे आकडेवारीत दिसून येते.
स्थानिक पाऊस नोंदी -
मृग नक्षत्रात पहिला पाऊस कधी पडला त्या दहा वर्षांतील स्थानिक नोंदी या प्रमाणे आहेत....
३ जून २०११ पहाटे जोरदार पाऊस झाला होता, १२ जून २०१२ वादळी
पाऊस झाला होता, १६ जून २०१४ एक पाऊस झाला व नंतर पाठ फिरवली, १६ जून २०१५...३ वाजता एक तास जोरदार पाऊस होऊन नंतर हुलकावणी दिली, २१ जून २०१६, सायंकाळी पहिला जोरदार पाऊस झाला, ८ जून २०१७ रात्री अर्धा तास जोरात पाऊस, २४ जून २०१८ दुपारी सरी, ११ जून २०१९ सायंकाळी ५ वाजता अर्धा तास रिमझिम पाऊस झाला.
१२ जून २०२० रात्री नऊ ते दहा पहिला मुसळधार पाऊस झाला. या आकडे वारीत मुगाचा पहिला पाऊस दुसऱ्या किंवा तिसऱ्या चरणात पडलेला दिसतो.