शिरपूर तालुका युवा अध्यक्षपदी दीपक बागुल यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:29+5:302021-02-05T08:44:29+5:30
थाळनेर - अखिल भारतीय युवा कोळी समाज दिल्ली संस्थापक अध्यक्ष खेमचंद कोळी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजीव शिरसाठ, प्रदेश सरचिटणीस ...

शिरपूर तालुका युवा अध्यक्षपदी दीपक बागुल यांची निवड
थाळनेर - अखिल भारतीय युवा कोळी समाज दिल्ली संस्थापक अध्यक्ष खेमचंद कोळी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजीव शिरसाठ, प्रदेश सरचिटणीस डॉ. राजेंद्र सावळे, प्रदेश युवा सरचिटणीस राहुल ईशी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हाध्यक्ष संतोष कोळी यांनी इंजिनिअर दीपक अशोक बागुल यांची शिरपूर तालुका युवा अध्यक्षपदी निवड केली आहे. बागुल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना याविषयीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. आदिवासी कोळी जमातीवर शासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात व आदिवासी कोळी जमातीच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सर्वांगिण विकासासाठी काम करणार असल्याचे बागुल यांनी निवडीनंतर सांगितले. त्यांच्या भावी वाटचालीसाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रदेश युवा अध्यक्ष अश्विनभाऊ सोनवणे, धुळे जिल्हा संघटक अनिल जाधव, युवा नेते मयूर सोनवणे, प्रदेश कोषाध्यक्ष शिवा महाराज भांडे, खान्देश विभाग सरचिटणीस संदीप कुवर, खान्देश विभागप्रमुख प्रवीण कोळी, उत्तर महाराष्ट्र कर्मचारी अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कैलास बाविस्कर, खान्देश उपाध्यक्ष समाधान कोळी, डॉ. हरिराम भांडे, नंदुरबार जिल्हा सरचिटणीस प्रा. गोविंदा कोळी, जितेंद्र कोळी यांनी शुभेच्छा दिल्या.