संत श्रेष्ठ नरहरी महाराज स्मारकाचे आज होणार लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:47+5:302021-08-20T04:41:47+5:30

महानगरपालिका धुळे आणि स्मारक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे असून ...

Dedication of Sant Shrestha Narhari Maharaj Memorial will be held today | संत श्रेष्ठ नरहरी महाराज स्मारकाचे आज होणार लोकार्पण

संत श्रेष्ठ नरहरी महाराज स्मारकाचे आज होणार लोकार्पण

महानगरपालिका धुळे आणि स्मारक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे असून दिपप्रज्वलन माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमास महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, शिरपूर नगराध्यक्ष भूपेश पटेल, भाजपा महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, आयुक्त अजिज शेख, बडोदा येथील उद्योजक गंगाधर जगताप, नंदकुमार वडनेरे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यास माजी महापौर कल्पना महाले, जयश्री अहिरराव, तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर भगवान गवळी, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास संतांची मांदियाळी असून संत सभागृहाचे उद्घाटन हभप मेघश्याम महाराज, हभप खगेन्द्र महाराज, हभप कृष्णा माऊली बेलदारवाडीकर, अशोकराव आटकरे गुरुजी, उर्मिला पिंगळे, भालचंद्र दुसाने यांची उपस्थिती राहणार आहे. याच सोहळ्यात सुवर्ण पंढरी धुळे गौरव विशेषांकाचे प्रकाशन तसेच संत नरहरी महाराजांच्या जीवनावर आणि सुवर्णकार समाजाचा आढावा, रिंगण या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.

सुवर्ण पंढरीत होणाऱ्या या सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार तसेच संत नरहरी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज पदाधिकारी तसेच महिला मंडळ मध्यवर्ती समिती सुवर्णकार समाज तसेच सर्व शाखांचे अध्यक्ष यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

Web Title: Dedication of Sant Shrestha Narhari Maharaj Memorial will be held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.