कोरोनाकाळात घटले गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:56+5:302021-07-22T04:22:56+5:30
भूषण चिंचोरे धुळे - कोरोनाकाळात नैसर्गिक गर्भपात कमी झाले आहेत. येथील हिरे वैद्यकीय महाविद्यलयात २०१९ च्या तुलनेत २०२० ...

कोरोनाकाळात घटले गर्भपात
भूषण चिंचोरे
धुळे - कोरोनाकाळात नैसर्गिक गर्भपात कमी झाले आहेत. येथील हिरे वैद्यकीय महाविद्यलयात २०१९ च्या तुलनेत २०२० व २०२१ यावर्षी नैसर्गिक गर्भपात झालेल्या महिलांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाकाळात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. कदाचित त्यामुळे देखील नैसर्गिक गर्भपाताच्या रुग्णांची संख्या कमी झाली असावी अशीही माहिती मिळालीय. खूप ताप येणे, गर्भाशयाचे तोंड लहान, गर्भाशयाचे दोन भाग असणे या कारणांमुळे नैसर्गिक गर्भपात होतात.
गर्भ असताना कोरोना झाला तर
गर्भ असताना कोरोनाचा संसर्ग झाला तर वेळेपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता असते. तसेच काही प्रमाणात गर्भपात देखील होऊ शकतात. मात्र अशा महिलांची संख्या कमी आहे. त्यामुळे गर्भवती असतांना कोरोनाची बाधा झाली तर घाबरून जाऊ नये. इतर बाधित रुग्णांप्रमाणेच गर्भवती महिलेवर देखील उपचार केले जातात.
तर घाबरू नये
२०१९ च्या तुलनेत नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण कमी झाले आहे. गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरून जाऊ नये. गर्भवती महिला व स्तनदा मातांचेही कोरोना लसीकरण सुरु झाली आहे. शंका न बाळगता तात्काळ लस घ्यावी.
- डॉ. अरुण मोरे, प्रसूती व स्त्रीरोग विभाग प्रमुख हिरे महाविद्यालय