सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:01+5:302021-02-05T08:46:01+5:30
धुळे जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी तिघांना काेरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने ...

सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्येत घट
धुळे जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी तिघांना काेरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्हातील बाधितांची संख्या १४ हजार ८१२ वर पोहचली आहे.
जिल्हा रुग्णालय धुळे येथील १०८ अहवालांपैकी शून्य अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील शून्य अहवालांपैकी शून्य अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २७ अहवालांपैकी शून्य अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
भाडणे साक्री सीसीसीमधील ३४ अहवालांपैकी शून्य अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. महानगरपालिका रॅपिड अँटिजन टेस्टमधील ९७ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वृंदावन कॉलनी धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ५ अहवालांपैकी शून्य अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. एसीपीएम लॅबमधील शून्य अहवालापैकी शून्य अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. खासगी लॅबमधील ९ अहवालापैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. बाबरे-निमगूळ, धुळे १, आग्रारोड धुळे एकाचा समावेश आहे. दरम्यान जिल्हात बाधितांची संख्या १४ हजार ८१२ वर पोहचली आहे.