धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:43+5:302021-08-20T04:41:43+5:30

धुळे : जिल्ह्यात पावसाअभावी करावी लागलेली दुबार, तिबार पेरणी, पिकांची खुंटलेली वाढ आणि लघु तसेच मध्यम प्रकल्पांमधील पाण्याचा अत्यल्प ...

Declare famine in Dhule district | धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

धुळे : जिल्ह्यात पावसाअभावी करावी लागलेली दुबार, तिबार पेरणी, पिकांची खुंटलेली वाढ आणि लघु तसेच मध्यम प्रकल्पांमधील पाण्याचा अत्यल्प साठा या साऱ्या कारणांमुळे धुळे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यानच्या काळात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाने केली आहे.याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नुकतीच निदर्शने केली. तसेच उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन दिले. त्यात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यात आली. जिल्ह्यातील पाऊस आणि पिकांच्या परिस्थितीची कल्पना प्रशासनाला दिली आहे.

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष जाधव, उत्तर महाराष्ट्र सल्लागार ॲड. बापू थोरात, जिल्हाध्यक्ष संतोष अमृतसागर, जिल्हा उपाध्यक्ष जितू पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना बागुल, प्रसिद्ध प्रमुख दुर्योधन पाटील, जिल्हा युवा संघटक पवन अहिरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Declare famine in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.