काेरोनामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:38+5:302021-07-01T04:24:38+5:30

धुळे : चर्मकार समाज कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर वारसदाराला पाच लाखांपर्यंतचे व्यवसाय कर्ज देण्याची नवीन ...

Debt up to Rs 5 lakh for the family of the deceased due to Carona | काेरोनामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज

काेरोनामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज

धुळे : चर्मकार समाज कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर वारसदाराला पाच लाखांपर्यंतचे व्यवसाय कर्ज देण्याची नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती चर्मकार महामंडळाने दिली.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी सपोर्ट फाॅर मार्जिनलाईस इंडिव्हीज्युअल फाॅर लाईव्हलीहुड ॲण्ड एन्टरप्राईझेस (स्माईल) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेंतर्गत ‘कोविड-१९’ मुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे, अशा कुटंबातील प्रमुख वारसदारास एनएसएफडीसी., नवी दिल्ली यांच्यामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यु. जे. देवकर यांनी दिली.

एनएसएफडीसी योजनेसाठी कर्जाची रक्कम ४ लाख रुपये असेल, तर एक लाख रुपये भांडवली अनुदान असेल. व्याज दर ६ टक्के राहील. या कर्जासाठी मृत व्यक्तीची आवश्यक माहिती आवश्यक आहे. त्यात मृत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात / पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असावे. ‘कोविड-१९’ च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने सदर माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

Web Title: Debt up to Rs 5 lakh for the family of the deceased due to Carona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.