रुग्णाच्या घरी जाऊन केले कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:31 IST2020-03-06T12:30:44+5:302020-03-06T12:31:09+5:30

पिंपळनेर : अंमलबजावणी तत्परतेने होण्यासाठी राबविला उपक्रम

Debt-free going to the patient's home | रुग्णाच्या घरी जाऊन केले कर्जमुक्त

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण राज्य सरकारने आखल्या नंतर त्याची अंमलबजावणी तत्परतेने होण्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी यांनी रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णांना कर्जमुक्त केले आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासंदर्भात यादी जाहीर केल्यानंतर संबंधित बँकेच्या कर्मचाºयांनी अशा शेतकºयांचा शोध घेत त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ याचा लाभ मिळवून दिला आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत ज्या शेतकºयांचे कर्ज माफ झालेले आहे अशा सर्वांचा शोध घेण्यात आला. यात बँकेकडे २९४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यातील बँकेने २९२ व्यक्तींना आतापर्यंत हा लाभ मिळवून दिला आहे आणि यांना कर्जमुक्त केले आहे व उर्वरित दोन लाभार्थी हे इतर राज्यात गेले असल्याने ते परत येतात त्यांनाही हा लाभ ते मिळून देणार आहेत बँकेने आपले हे काम ९९ टक्के पूर्ण केले आहे. या कर्जमुक्तीचा लाभ मिळून देण्यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी व चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाधिकारी परिक्षित अहिरराव, पराग पाटील, बँक इन्स्पेक्टर हेमंत जगताप यांनी कर्जमाफी सदस्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी अवघ्या काही दिवसातच हे काम पूर्ण केले आहे. तसेच या शेतकºयांना दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष घरी जाऊन, संपर्क साधून त्यांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान बॅँकेचे कर्मचाºयांनी चिकसे येथे जाऊन आजारी असलेल्या केवलबाई मधुकर आघाव यांना कर्जमुक्त केले. त्यांच्यावर विकासोचे २५ हजाराचे कर्ज होते. कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांमध्ये आनंद पाहण्यास मिळाला.दरम्यान पिंपळनेर परिसरात अजून कर्ज असलेल्या शेतकºयांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Debt-free going to the patient's home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे