धाडरी येथे मतदार प्रतिनिधींमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:07 IST2018-09-26T13:06:32+5:302018-09-26T13:07:49+5:30
पोलिसांनी घेतले ताब्यात, मतदान पुन्हा सुरू

धाडरी येथे मतदार प्रतिनिधींमध्ये वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील धाडरी येथे सकाळी ग्रा.पं. निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर मतदाराची ओळख पटविण्यावरून मतदान केंद्रात बसलेल्या राजकीय पक्षांच्या मतदार प्रतिनिधींमध्ये केंद्रातच वाद निर्माण झाला. हाणामारीत इव्हीएम मशिन ठेवलेला टेबल उलटला.त्यामुळे मशिन खाली पडल्याने मतदानाचा काही काळ खोळंबा झाला. मात्र तपासणीत मशिन सुरू असल्याने त्याद्वारे मतदानास सुरूवात झाली, अशी माहिती धुळे ग्रामीणचे तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.
तालुका पोलिसांनी तातडीने मतदार प्रतिनिधींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात ७४ ग्रा.पं.साठी मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्या अंतर्गत आज सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाला. धुळे तालुक्यातील १४ ग्रा.पं.साठी मतदान होत आहे. धाडरी येथे सकाळी या वादामुळे काही काळ मतदानास खोळंबा झाला. मात्र तहसीलदार मोरे यांनी त्वरित तेथे जाऊन माहिती घेतली. तसेच प्रक्रिया पूर्ववत सुरळीत केली. पोलिसांनी मतदान केंद्रात वाद घालणाºया प्रतिनिधींना ताब्यात घेतल्याचे तहसीलदार मोरे यांनी सांगितले. तालुक्यात अन्यत्र मात्र सुरळीत मतदान सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.