वीज पडल्याने युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:11 IST2019-07-01T11:11:01+5:302019-07-01T11:11:29+5:30

धाडरे येथील घटना  : - बकºया शेतात फिरवितांना झाला मृत्यू 

Death of the woman due to electricity collapse | वीज पडल्याने युवतीचा मृत्यू

अर्चना ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  तालुक्यातील धाडरे या गावात आज दुपारी विज पडली त्यात १५ वर्षाची अर्चना अशोक ठाकरे या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याशिवाय तीन बकºयाही ठार झाल्या आहेत.
धाडरे येथे राहणारे लालचंद   केशव मोरे यांच्याकडे शिकण्यासाठी आलेली त्यांच्या साडूची अकरावीत शिकणारी मुलगी  अर्चना अशोक ठाकरे (वय १५ वर्ष) ही रविवारी दुपारी १२ वाजता शेतात बकºया   घेऊन गेली होती. यावेळी तिच्या अंगावर  वीज कोसळली. त्यात ती व तीन बकºया गंभीररित्या जखमी झाल्यात.  अर्चनाला तात्काळ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उपचारासाठी सतीश पवार याने दाखल केले. तिला वाचविण्यासाठी मिळण्यासाठी तेथील डॉक्टर व रुग्णसेवक गोकुळ राजपूत यांनी शर्थीचे प्रयत्न केले़  मात्र तिचा मृत्यू झाला. तसेच तीन बकºयांचाही मृत्यू झाला. 
 धुळे ग्रामीणचे आमदार   कुणाल पाटील यांनी   संबंधित अधिकाºयांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सुचना केल्या आहेत. यासंदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Death of the woman due to electricity collapse

टॅग्स :Dhuleधुळे