विजेचा शॉक लागून दोन भावंडाचा मृत्यू
By Admin | Updated: June 1, 2017 13:34 IST2017-06-01T13:34:47+5:302017-06-01T13:34:47+5:30
इंदिरा नगरात राहणा:या सूर्यवंशी कुटुंबातील दोन भावांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

विजेचा शॉक लागून दोन भावंडाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
पिंपळनेर,दि.1- शहरातील इंदिरा नगरात राहणा:या सूर्यवंशी कुटुंबातील दोन भावांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
इंदिरा नगरात राहणा:या रवींद्र सूर्यवंशी (वय 24), त्याचा लहान भाऊ सागर सूर्यवंशी (21) या दोघांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. घरात काम करत असताना सागर सूर्यवंशी यास विजेचा शॉक लागला. त्यास सोडविण्यास गेलेल्या रवींद्र सूर्यवंशी यालाही विजेचा शॉक बसला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.