मृत्युदर ३ टक्क्यांवर घसरला, मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 17:38 IST2020-08-23T17:38:27+5:302020-08-23T17:38:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील मृत्युदर ३ टक्के इतका खाली आला आहे. एप्रिल महिन्यात मृत्युदर २५ टक्के इतका ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील मृत्युदर ३ टक्के इतका खाली आला आहे. एप्रिल महिन्यात मृत्युदर २५ टक्के इतका होता. त्यानंतर जून महिन्यात ११ टक्के इतका झाला होता. आॅगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मृत्युदर मात्र ३ टक्के इतका खाली आला आहे.
जिल्ह्यातील २०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचे प्रमाण वाढले आहे. मात्र रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्युदरात घसरण झाल्याचे दिसते आहे.
दरम्यान, मृतांपैकी केवळ १७ रुग्णांचा मृत्यू निव्वळ कोरोनामुळे झाला आहे. उर्वरित १८८ रुग्णांना कोरोनासोबतच इतर व्याधीही होत्या. मृतांमध्ये, कोरोना व अन्य एक व्याधी असलेल्या ६६ जणांचा समावेश आहे. कोरोना व इतर आणखी दोन प्रकारच्या व्याधी असलेल्या ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५० रुग्णांना कोरोना सोबतच अन्य तीन व्याधी जडलेल्या होत्या.