धुळे जिल्हा रूग्णालयातील तिसºया मजल्यावरून पडल्याने रूग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:53 IST2018-03-07T15:53:38+5:302018-03-07T15:53:38+5:30
तीन दिवसांपासून उपचारासाठी झाला होता दाखल

धुळे जिल्हा रूग्णालयातील तिसºया मजल्यावरून पडल्याने रूग्णाचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
धुळे : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णाचा तिसºया मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. सचिन सीताराम क्षिरसागर (३८ , रा. चौधरीवाडा, चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
सचिन क्षिरसागर याला दारूचे व्यसन होते. उपचारासाठीच तो सोमवार (दि.५ मार्च) पासून धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल झालेला होता.तिसºया मजल्यावरील वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्यासोबत आई शकुंतला क्षिरसागर या देखील होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार सचिन क्षिरसागर हा आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिसºया मजल्यावरील व्हरांड्यात बसला होता. तोल गेल्याने, तो तळमजल्यावरील मोकळ्या जागेत पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी त्याची चपला व रक्त पडलेले होते.
आवाज होताच कर्मचारी धावले
वरून कोणीतरी पडल्याने जोराचा आवाज झाला. आवाज येताच रूग्णालयातील कर्मचारी, काही नागरिक घटनास्थळी धावतच गेले. त्यांनी तत्काळ त्याला उचलून अपघात विभागात आणले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती.
नेमके काय घडले ते अस्पष्ट
दरम्यान सचिन क्षिरसागर याने उडी मारून आत्महत्या केली की तोल गेल्याने पडला याबाबत माहिती देण्यास रूग्णालयातील कोणीच तयार नव्हते. त्यामुळे नेमके काय घडले ते स्पष्ट होवू शकले नाही.
पोलीस दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीसही जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.
नेमकी माहिती नाही : डॉ. नागे
रूग्ण वरून पडताच कर्मचारी धावत गेले. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र नेमकी घटना कशी घडली,त्याबाबत माहिती नाही असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण नागे यांनी सांगितले.