धुळ्यात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 16:41 IST2020-07-05T12:54:09+5:302020-07-05T16:41:42+5:30
साक्री तालुक्यात दोन नवीन रुग्ण

dhule
धुळे : येथील पारोळा रोडवरील बडगुजर प्लॉट येथील ५९ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ़ विशाल पाटील यांनी दिली़
दरम्यान, हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून दुपारी साडेबाराला प्राप्त झालेल्या अहवालानुसार साक्री तालुक्यात दोन नवीन रुग्ण वाढले आहेत़ जैताणे येथील कुंभारवाड्यातील दोन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत़
धुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एकूण ६६ झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत १२५० रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे़ त्यापैकी ७९१ रुग्ण बरे झाले आहेत़ प्रत्यक्षात ३९४ रुग्ण उपचार घेत आहेत़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे़