पांझरा नदीत बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:01 IST2017-09-16T19:00:03+5:302017-09-16T19:01:12+5:30
पांझरा नदीत पडल्याने दत्तू जीवन माळीच (वय-60) यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मालपूर ता़ साक्री येथे घडली़

पांझरा नदीत बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.16 - पांझरा नदीत पडल्याने दत्तू जीवन माळीच (वय-60) यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मालपूर ता़ साक्री येथे घडली़ या प्रकरणाची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली़
साक्री तालुक्यातील मालपूर येथील दत्तू जीवन माळीच हे शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पांझरा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होत़े नदीवर गेल्यानंतर त्यांचा पाय घसरला आणि ते नदीत पडल़े नदीत खड्डा असल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही नागरिकांनी त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढले. त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल़े याठिकाणी डॉ़ साधना पाटील यांनी त्यांना मयत घोषित केल़े मगन जगन माळीच यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.