विहिर खोदकाम करताना क्रेनखाली दबून मजुराचा मृत्यू

By Admin | Updated: May 8, 2017 12:25 IST2017-05-08T12:25:33+5:302017-05-08T12:25:33+5:30

साक्री तालुक्यातील कुत्तरमारे येथील घटना

The death of the laborer under the crane while digging a well | विहिर खोदकाम करताना क्रेनखाली दबून मजुराचा मृत्यू

विहिर खोदकाम करताना क्रेनखाली दबून मजुराचा मृत्यू

 धुळे,दि.8- साक्री तालुक्यातील कुत्तरमारे येथे विहीरीचे खोदकाम करतांना क्रेन तुटून विहीरीत पडून त्याखाली दबून मजुराचा मृत्यू झाला आह़े ही दुर्देवी घटन रविवारी दुपारी घडली आह़े 

गोकुळ आसाराम बागुल (वय 48 रा़ पन्हाळीपाडा ता़ साक्री) असे मयताचे नाव आह़े ते रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कुत्तरमारे गाव शिवारातील कांतीलाल लालु ठाकरे यांच्या शेतातील विहीरीत खोदकाम करीत होत़े त्यावेळी अचानक क्रेन तुटून विहीरीत पडली. त्याखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला़ याबाबत काशिनाथ पांडू बागुल (रा़ ठाणेपाडा ता़ जि़ नंदुरबार) यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े 

Web Title: The death of the laborer under the crane while digging a well