राजगारपाडा येथे अंगावर वीज पडल्याने मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 18:27 IST2017-09-16T18:24:53+5:302017-09-16T18:27:58+5:30
वनजमिनीवर गुरे चारत असताना दुर्दैवी मृत्यू

राजगारपाडा येथे अंगावर वीज पडल्याने मुलाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.16 - वीज अंगावर कोसळल्याने रायसिंग सायसिंग पावरा (वय-14) या मुलाचा करुण अंत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी शिरपूर तालुक्यातील राजगारपाडा गावात घडली़.
शिरपूर तालुक्यातील राजगारपाडा येथील रायसिंग हा मुलगा शुक्रवारी गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता़ राजगारपाडानजिक असलेल्या काळीद गावाच्या शिवारातील वनजमिनीत मवादेवीपाडा टेकडीवर तो उभा असताना अचानक वीज कोसळली़ त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला़ शिरपूर तालुक्यातील कोडीद ग्राम टाक्यापाणी येथील रहिवासी रणसिंग ओंकार पावरा (39) यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली़ त्यावरुन शुक्रवारी दुपारी 3 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद आह़े