बुराई नदीच्या पात्रात आढळला मृत तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:13 IST2020-03-25T12:12:32+5:302020-03-25T12:13:30+5:30
शिंदखेडा : आत्महत्येचा संशय, पोलिसात नोंद

बुराई नदीच्या पात्रात आढळला मृत तरुण
शिंदखेडा : बुराई नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला़ तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील विरदेल रोड, साई नगरात राहणाऱ्या राहुल (रमेश) सुनिल मराठे (२०) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बुराई नदीवरील असलेल्या केटीवेअर धरणात तरंगताना आढळून आला. दोन दिवसांपासून राहुल हा बेपत्ता होता.
त्याचा मृतदेह धरणात तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पी एस आय सुशांत वळवी पोलीस कर्मचारीसह दाखल झाले. मयतच्या मृतदेहाची अवस्था खूपच खराब झाली होती. त्याला ओळखणे देखील कठीण जात होते. त्याच्या हातावर गोंदलेल्या नावावरुन त्याची ओळख पटली.
त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्याचा शवविच्छेदन करुन सायंकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सायंकाळी उशीरा त्याच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.