२ वर्षापासून पथदिवे बंद असल्याने अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:11 IST2020-06-17T22:10:41+5:302020-06-17T22:11:21+5:30
प्रभाग १६: श्रीराम नगरातील नागरिकांची समस्या ; नगरसेवकांचे दुर्लक्ष

dhule
धुळे : येथील मिल परिसर भागातील श्रीराम नगरात वीज वितरण कंपनीच्या पोलवर पथदिवे केवळ शोभेचा ठरत आहे़ त्यामुळे येथील रहिवाशांना तब्बल दोन वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे़ मनपा व स्थानिक नगरसेवकांनी वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे़
शहरातील मिल परिसर भागातील प्रभाग क्रमांक सतरा मधील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ या परिसरातील अनेक ठिकाणी गटारीची स्वच्छता झालेली नाही़ पावसाचे पाणी रस्त्यावर येवून साचते़ त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ याच परिसरातील सार्वजनिक शौचालयाची वेळेवर स्वच्छता केली जात नाही़ त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते़ येथील काही भाग दाटवस्तीचा आहे़ त्यामुळे वेळीच स्वच्छता होण्याची गरज असतांना होत नसल्याने नागरिकांनी व्यक्त केली आहे़ श्रीराम नगरातील एका किराणा दुकाना समोरील पोल क्र.सी.आर ८५ वरील पथदिवा दोन वर्षापासून बंद पडला आहे़ तसेच याठिकाणी पावसाचे पाणी साचते़ त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अडचणी सामोरे जावे लागते़ पथदिवा बदलविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला़ मात्र अद्याप दखल घेण्यात आलेली नाही़
त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ महापालिका तातडीने भागात सर्व्हेक्षण करून जुने पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिव्यांचा बसविण्याची मागणी होत आहे़