लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर तालुक्यातील तरडीजवळ ट्रक, अॅपेरिक्षा आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघाताची घटना शनिवारी सकाळी घडली़ यात गोरख मणिराम पाटील (६४), धनराज संतोष पाटील (५२), निवृत्ती एकनाथ पाटील (४२) आणि सुकदेव गिरधर पाटील (६८) रा़ तरडी ता़ शिरपूर येथील रहिवाशी आहेत़ घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ अपघातानंतर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़
तरडीजवळ विचित्र अपघात, चौघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:20 IST