दुग्ध शाळेतील रोजंदारी कामगारांना मिळणार कायम कर्मचारीचा लाभ संपर्क करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:32+5:302021-08-13T04:40:32+5:30

दुग्ध शाळेच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आनंदा वेडू जाधव (मजूर, सेवानिवृत्त), भुरसिंग संभाजी वाघ (शिपाई, सेवानिवृत्त), मंगू गोबजी ...

Dairy school wage workers will get permanent staff benefits | दुग्ध शाळेतील रोजंदारी कामगारांना मिळणार कायम कर्मचारीचा लाभ संपर्क करण्याचे आवाहन

दुग्ध शाळेतील रोजंदारी कामगारांना मिळणार कायम कर्मचारीचा लाभ संपर्क करण्याचे आवाहन

दुग्ध शाळेच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आनंदा वेडू जाधव (मजूर, सेवानिवृत्त), भुरसिंग संभाजी वाघ (शिपाई, सेवानिवृत्त), मंगू गोबजी गरुड (दुग्धशाळा परिचर, सेवानिवृत्त), आनंदसिंग अंबरसिंग गिरासे (फिटर, सेवानिवृत्त), सुकदेव भिवा पाटील (पहारेकरी, सेवानिवृत्त), काशीनाथ पोपट पाटील (वाहनचालक, सेवानिवृत्त), रामदास नागो माळी (पहारेकरी, सेवानिवृत्त), कल्लुसिंग किसनसिंग राजपूत (दुग्धशाळा परिचर, सेवानिवृत्त) हे रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

या कर्मचाऱ्यांना कायमपणाचे लाभ देण्याबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण खंडपीठ, औरंगाबाद यांनी आदेशित केले आहे. त्याआनुषंगाने या आठ कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वारसांनी २५ ऑगस्टपर्यंत महालेखापाल, मुंबई यांच्याकडील पीपीओची प्रत, मृत्यू झाला असल्यास कायदेशीर वारस दाखला, मृत्यू दाखला, फोटो, आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स प्रत्येकी ३ प्रतीत समक्ष उपस्थित राहून सादर करावीत. अन्यथा आपणास देय लाभांची आवश्यकता नाही, असे गृहीत धरून प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असे व्यवस्थापक सोनार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Dairy school wage workers will get permanent staff benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.