अंतर ठेवूनच ग्राहकांना करावा लागतो भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:04 IST2020-03-25T12:03:47+5:302020-03-25T12:04:08+5:30
शिरपूर : बँक प्रशासनाची खबरदारी, एंट्री करताच हात धुण्यासाठी सुविधा

अंतर ठेवूनच ग्राहकांना करावा लागतो भरणा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : सर्व जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे़ महाराष्ट्रात सुध्दा कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे़ हा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायासाठी पाऊले उचललेली आहे़ यामध्ये बसस्थानक, शासकीय कार्यालय, बँका यांनीही प्रतिबंधात्मक विशेष खबरदारी घेतली आहे़
शहरातील सर्व बँकामध्ये भरणा, पैसे काढणे आदी व्यवहारासाठी जावे लागते़ त्यामुळे कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच बँकामध्ये दोन ग्राहकांमधील अंतराची एक मिटरची मार्कींग वा बँकेत असलेले बागडे, खुर्च्या लावून ते अंतर ठेवण्यात आले आहे़ जेणेकरून दोन ग्राहकांमध्ये अंतर राहून या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ एक मिटर अंतरावरूनच बँक अधिकाऱ्यांशी बोलणे वा रक्कमेचा भरणा करावा लागत आहे़ यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होईल असे सांगण्यात येत आहे़ तसेच बँकेत एंट्री करण्यापूर्वी बँकेचा संबंधित कर्मचारी येणाºया ग्राहकाला हात धुण्याचे सुचित केल्यानंतर बँकेत प्रवेश दिला जात आहे़ सोमवारी बहुतांशी बँकेत ग्राहकांची फारशी गर्दी दिसून आली नाही़
उन्हाच्या वेळेत तर एकही बँकेकडे फिरकले नाहीत़नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे़
सोमवारी दिवसभर नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल हे अन्य दुकाने उघडी असलेल्यांना बंद करण्याचे सूचित करीत होते़