जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी - जिल्हाधिकारी ; शासकीय कार्यालयांमध्येही नो एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:48+5:302021-04-15T04:34:48+5:30

अत्यावश्यक सेवेमध्ये नमूद केलेल्या सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. वरील प्रमाणे लागू केलेल्या निर्बंधातून अत्यावश्यक ...

Curfew order issued in the district - Collector; No entry even in government offices | जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी - जिल्हाधिकारी ; शासकीय कार्यालयांमध्येही नो एण्ट्री

जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी - जिल्हाधिकारी ; शासकीय कार्यालयांमध्येही नो एण्ट्री

अत्यावश्यक सेवेमध्ये नमूद केलेल्या सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. वरील प्रमाणे लागू केलेल्या निर्बंधातून अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक सेवा देणारे घटकांना सूट राहील; मात्र संबंधितांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. या कालावधीत सूट दिलेल्या सेवा व उपक्रम हे कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत नियमावलीचे पालन करण्याच्या अधीन राहून सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवा : हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनिक, मेडिकल विमा कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवेशी संबंधित घटक तसेच सदर सेवेशी संबंधित उत्पादक व वितरक, वाहतूक व पुरवठा करणारी यंत्रणा, व्हॅक्सिन उत्पादक व वितरण घटक, सॅनेटायजर, मॉस्क, वैद्यकीय उपकरणांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल उत्पादन करणारे घटक व त्या अनुषंगिक सेवा. पशुवैद्यकीय सेवा, पाळीव प्राण्यांचे निवारागृह, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, फळ दुकाने, सर्व प्रकारची खाद्य दुकाने, शीतगृहे, गोदाम सेवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था : विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा, स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेने मान्सून पूर्व कामे, स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेने सार्वजनिक सेवा, माल वाहतूक, पाणी पुरवठा सेवा, कृषी संबंधित सेवा/उपक्रम, शेती संबंधित कामे, बियाणे, खते, उपकरणे दुरुस्ती, सर्व वस्तूंची आयात- निर्यात, मान्यताप्राप्त मीडिया, पेट्रोल पंप व पेट्रोल पंपाशी संबंधित उत्पादने, सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहील.

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहतील. वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण करून घ्यावे.

शाळा व महाविद्यालये बंद राहतील; मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याकरिता या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था अथवा संघटना कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Curfew order issued in the district - Collector; No entry even in government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.