आधार प्रमाणिकरणासाठी शेतकऱ्यांची बॅँकेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:58 IST2020-03-02T12:58:22+5:302020-03-02T12:58:55+5:30

शिंदखेडा : पहिल्या यादीत ८३९ शेतकरी पात्र

Crowds at farmers' banks for Aadhaar certification | आधार प्रमाणिकरणासाठी शेतकऱ्यांची बॅँकेत गर्दी

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत कर्जदार खातेदारांसाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी येथील बँकेत मोठी गर्दी केली होती.
कर्जमाफीसाठी बँकेने ९२१ थकबाकी कर्जदार सभासदांची यादी शासनाकडे पाठवली होती. त्यात पहिल्या यादीत ८३९ सभासद कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे आॅनलाईन आधार लिंक व थम्बसाठी बँकेने स्वतंत्र काऊंटर सुरू केले असून त्याचा लाभ शेतकºयांना होत आहे. शिंदखेडा येथील डीडीसी बँकेत भडणे येथील थकबाकीदार महिला शेतकरी सभासद कुसुमबाई मोहन माळी यांना तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याहस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक निबंधक संजय गीते, विभागीय अधिकारी दिलीप चौधरी, बँकेचे शाखाधिकारी आर.बी. पाटील, तपासणीस एम.जे. पाटील, बी.वाय. महाले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Crowds at farmers' banks for Aadhaar certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे