गर्दी उसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST2021-06-17T04:25:08+5:302021-06-17T04:25:08+5:30
मैदाने गजबजली धुळे : अनलाॅकनंतर मोकळ्या मैदानांवर व्यायाम करण्याची परवानगी मिळाल्याने विविध मैदानांवर खेळाडू येऊ लागले आहेत. त्यामुळे ही ...

गर्दी उसळली
मैदाने गजबजली
धुळे : अनलाॅकनंतर मोकळ्या मैदानांवर व्यायाम करण्याची परवानगी मिळाल्याने विविध मैदानांवर खेळाडू येऊ लागले आहेत. त्यामुळे ही मैदाने पुन्हा गजबजली असून, खेळाडूंना काैशल्य विकासाची संधी मिळाली.
नालेसफाई व्हावी
धुळे : शहरातून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई पालिकेने पावसाळ्याआधी केली. पंरतु तरीही नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा अडकलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
तलावाकडे धाव
धुळे : शहरापासून जवळच असलेल्या नकाने तलाव परिसरात पायी फिरणारे आणि व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी अबालवृध्द नकाने तलावाकडे धाव घेताना दिसत आहेत.
फुलझाडांसाठी कुंडी
धुळे : पावसाळ्यात अनेकांचा कल घराच्या परिसरात फुलझाडे आणि इतर शोभेची रोपे लावण्याकडे असतो. त्यासाठी लागणाऱ्या कुंड्या धुळे शहरात दाखल झाल्या असून, ८० ते २०० रुपयांपर्यंत त्यांचा दर असल्याचे विक्रेत्याने सांगितले.