लाटीपाडा धरणात पोहून न थांबता ३२०० मीटर अंतर पार..ते ही अवघ्या २ तास २० मिनिटात ​पिता-पुत्राचा विक्रम ज्ञानाच्या सागराबरोबरच जलतरणाचे धडे गिरवणारा अवलिया शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:59+5:302021-02-23T04:53:59+5:30

सराव करतानाच तब्बल ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पार केले. वीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पोहत होतो, त्या वेळी ६० ...

Cross the distance of 3200 meters without stopping to swim in Latipada dam. | लाटीपाडा धरणात पोहून न थांबता ३२०० मीटर अंतर पार..ते ही अवघ्या २ तास २० मिनिटात ​पिता-पुत्राचा विक्रम ज्ञानाच्या सागराबरोबरच जलतरणाचे धडे गिरवणारा अवलिया शिक्षक

लाटीपाडा धरणात पोहून न थांबता ३२०० मीटर अंतर पार..ते ही अवघ्या २ तास २० मिनिटात ​पिता-पुत्राचा विक्रम ज्ञानाच्या सागराबरोबरच जलतरणाचे धडे गिरवणारा अवलिया शिक्षक

सराव करतानाच तब्बल ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पार केले. वीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पोहत होतो, त्या वेळी ६० ते ७० मीटर अंतर एका दमात पार करत असे. वीस वर्षांपासून पोहणे बंद होते. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात सुट्या होत्या. त्याचदरम्यान बीड जिल्ह्यातील ८० वर्षांच्या दिव्यांग वृद्धाचा व्हिडिओ बघितला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपल्यालाही चांगलं पोहता येतं, त्यात काहीतरी नावीन्य करावं, असा निर्णय घेतला.

पोहणे उत्तम व्यायामही आहे, म्हणून रोज लाटीपाडा धरणात पोहण्याचा सराव सुरू केला. ५० ते ६० मीटर अंतर रोज पोहत होतो. एके दिवशी धरणाच्या सांडव्याचे २९० मीटर अंतर पार केले. पुन्हा जिद्द, चिकाटीने परत येताना तेवढेच अंतर पोहण्याचे ठरवले. त्यानुसार हे ३२०० मीटर अंतर अवघ्या २ तास २० मिनिटांत पार केले. दरम्यानच्या काळात मुलाचाही पोहण्याचा सराव करून घेतल्याचे सांगितले.

पोहायला येणे ही एक कला आहे. आत्मसात केली तर ती माणसाच्या जीवनाला तारक ठरते. खरे म्हणजे पाणी पाहिले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र

अवघड काम करताना मनात विनाकारण भीती बाळगू नये. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकतो.

पुस्तकी शिक्षणाचे धडे गिरवण्याबरोबरच आपल्या नजरेला भुरळ घालणारी कोणतीही गोष्ट आत्मसात करायची असेल तर त्या साठी जिद्द चिकाटी प्रबळ इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवूनच करावी, असे प्रतिपादन देखील शिक्षक कैलास बच्छाव यांनी केले.

Web Title: Cross the distance of 3200 meters without stopping to swim in Latipada dam.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.