तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:37+5:302021-07-31T04:36:37+5:30

जुलै महिन्यापासून सध्या सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळेच खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लहान ...

The crisis of the third wave, do not take the heat of the children | तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका

तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका

जुलै महिन्यापासून सध्या सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळेच खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. राज्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेत नेमके कोणते लक्षणे कोणती असतील, याबाबत निश्चित माहिती नसल्याने पालकांनी कोणतेही लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावा, डॉक्टरांच्या मते सर्दी-खोकल्याने रोज सुमारे ३० तर डेंग्यू- मलेरियाची लक्षणे घेऊन सुमारे ५ टक्के रुग्ण येत आहे.

ताप आला म्हणजे कोरोना असे नाही,पण.....

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये आढळून येतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्याने कोरोना झाले असे समजू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपल्या परिसरात व घरात सांडपाणी जमा हात असेल तर डेंग्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना भीती दुरू ठेवून डेंग्यू होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एकही लहान मुलाला काेरोना आढळून आलेला नाही. मात्र डेंग्यूवर उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पालकांना मुलांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरिया, जुलाब, अंगदुखी सारखे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.

-अभिनय दरवडे, बालरोगतज्ज्ञ

सर्दी, खोकला, तापाची साथ

सर्दी, खोकला, अंगदुखीचे सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण २५ ते ३० टक्के तर डेंग्यू-मलेरियाने बाधित साधारणत: ४ ते ५ टक्के रुग्ण आहेत.

घाबरू नका, उपचार घ्या

सर्दी-खोकला, अंगदुखी, सांधेदुखीचे रुग्ण वाढत आहेत. लक्षणानुरूप औषधी दिली जाते आहे. संसर्गजन्य तापाचे प्रमाणही वाढले आहे; परंतु यातून फारसे घाबरण्याचे कारण नाही. योग्य उपचार-काळजी अन‌् औषधी घ्यावी. रक्तदाब कमी आधिक झाला तरच रुग्ण दाखल केले जाते

अशी घ्यावी काळजी

गार पाणी व वस्तू टाळाव्यात, पाणी उकळून गार करून प्यावे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळवा.

पाण्यावर डास बसणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याची भांडी झाकून ठेवावी, फ्रीजमागील पाणी काढावे.

लक्षणे आढळल्यावर डॉक्टरांशी संपर्क करावा, वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती करणे आवश्यक आहे.

Web Title: The crisis of the third wave, do not take the heat of the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.