मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:08 IST2020-01-31T13:58:35+5:302020-01-31T14:08:28+5:30
इराण-इराक टेन्शन : देशाच्या अर्थकारणावर पडसाद उमटल्यास देशाची सुध्दा होरपळ होऊ शकते, परिणामी विचार करण्याची आवश्यकता

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारताची आर्थिक स्थिती इराक-इराणच्या तणावामुळे नाजूक होत आहे़ परिणामी मध्यपूर्र्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखीच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ जगाच्या अर्थकारणावर पडसाद उमटल्यास भारताची सुध्दा यात होरपळ होऊ शकते, असा अंदाज आहे़
इराण हा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न, विचारधारेने बळकट आणि शस्त्रसिध्द असा देश आहे़ तेलामुळे तो जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकतो़ आखाती देशामध्ये शियांचे साम्राज्य उभे करण्याची व्यूहरचना इराणच्या राज्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून केली़ येमेनपासून लेबनॉन, सिरीया, इराक अशा देशांमध्ये इराणचा थेट प्रभाव निर्माण करण्यात सुलेमानींचा वाटा महत्वाचा होता़ इसिसला थोपविण्याची कामगिरी त्यांनी बजावली होती़ ही बाब देशाच्या पातळीवर महत्वपूर्ण ठरत आहे़
आर्थिक मंदिचा फटका शक्य
विकसनशील बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अधिक निवडक असतील. आशियामधील आर्थिक मंदी या वर्षाच्या अखेरीस जोरात पडू शकेल आणि पुढील वसुली अधिक हळूहळू होईल, असा विश्वास आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्राने सादर करायला हवा़ पेट्रोलियम पदार्थ हे जीएसटीमध्ये आणायला हवे़ अपारंपारीक उर्जेची साधनांकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे़
- देवेंद्र विसपुते, प्राध्यापक
आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रीत केल्यास कोणत्याही दोन देशांचे युध्द होता कामा नये़ कोणताही प्रश्न हा चर्चेतून, संवादातून सोडविता येऊ शकतो़ काही परिस्थिती उदभवल्यास केंद्राने तशी तरतूद करुन ठेवावी़
- लक्ष्मीचंद आसिजा, धुळे
चायनाच्या वस्तू देशातील बाजारपेठ काबिज करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ तर इराक-इराणच्या वादाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली तर पेट्रोलजन्य पदार्थावर परिणाम जाणवेल़ केंद्राने दखल घ्यावी़
- अनिल खैरनार, धुळे